Events

s

कळविण्यास आनंद आहे कि आनंदाश्रय अणावमध्ये गेल्या वर्षी श्री सद्गुरू मंदीरात श्री दत्त गुरूंच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली. रीतीप्रमाणे शनिवार 14/12/2024 रोजी श्री दत्त जयंतीच्या अवसरी विधीवत कार्यक्रम साजरा करणे स. 9 वाजता योजिले आहे. तरी उपस्थित राहावे ही प्रार्थनास्थळ आनंदाश्रय अणाव मयेकर वाडी ता. कुडाळ सिंधुदूर्गळत्या आवाजात व्यक्त केला.

आनंदाश्रयातील आजोबांचा वाढदिवस साजरा करताना राणे कुटुंबीय व त्यांच्या लहान मुलांनी या आजी-आजोबांसोबत गाणी सादर केली. सगळीकडे स्वतंत्र दिन साजरा होत असताना या लहान मुलांनी आईबाबां सोबत आनंदाश्रयाच्या आजोबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. आनंदाश्रयच्या या पक्षाघाताने आजारी आजोबांसाठी हा नातवंडांसोबतचा वाढदिवस सोहळा स्वर्गीय आनंद सोहळा होता. आणि तो त्यांनी आनंदाश्रुसहित अडखळत्या आवाजात व्यक्त केला.

शरीराने थकलेल्या आजी आजोबाना आश्रमातच मनोरंजन व्हावं म्हणून हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला. आनंदी जीवनासाठी तनमनाला लागणा-या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.

आजोबांना रक्षाबंधन करताना मालवणी ग्रुपची मुलगी. समाजात राखी पौर्णिमेचा सण साजरा होत असताना आनंदाश्रयातील उपेक्षित आजी आजोबांची आठवण ठेऊन या मुली रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी आनंदाश्रयात आल्या.व आजी आजोबांना राख्खा बांधून व तोंड गोड करून आम्ही आपल्या सोबत आहोत याची ग्वाही दिली. आनंदाश्रयात असेच सर्व सण समाजातील कोणीनाकोणी येऊन साजरे करतात.

१ जुलै २०१६ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्हाधिकारी उदय चौधरी आनंदाश्रयच्या आवारात नारळ रोप लावताना सोबत सावंतवाडी मेडिकल असोसिएशन व डॉक्टर्स फैतार्निती. या निमित्ताने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आनंदाश्रयाच्या सेवाकार्याची माहिती जाणून घेतली व आजी आजोबांशी सावंद साधला. उत्तरउत्तरार्धातल्या या आजी आजोबासाठी चाललेल्या सेवा कार्याचे कौतुक करीत आनंदाश्रय सेवाश्रमाला पुन्हा एखदा सवडीने भेट देऊन मदत करीन असे आश्वासन दिले.या वेळी केइएम हॉस्पिटल मुंबईच्या निवृत्त मेट्रन श्रीम वैशाली गावडे उपस्थित राहिल्या व आनंदाश्रयच्या परिचारिकांना मार्गदर्शन केले.