About Us

जीवन संजीवन सेवा ट्रस्ट - आनंदाश्रय


अणाव,ता.कुडाळ,जि.सिंधुदग

समाजातील निराधार वृध्दांसाठी आम्ही इथे सेवा कार्य करतो. मुलांचा आधार नसलेली ही वृध्द माणसे आयुष्यभर उपजीविकेसाठी काबाड कष्टकरून पार थकलेली असतात. शारिरीक मानसिक दृष्ट्या विकलांग अशी त्यांची दयनिय अवस्था असते. आज समाजात मुलं असलेल्या वृध्दांचीच बिकट अवस्था होत आहे. तर अशा मुलं नसलेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या निराधार वृध्दांची तर दुर्दशाच. अशा बेवारस वृध्दांसाठी आम्ही इथे सेवाकार्य करतो. अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय उपचार असे या सेवआ कार्याचे स्वरूप असते आणि हे आपल्या दानशुर सहकार्यातुन गेली पाच वर्षे अखंड चालू आहे.

शारीरिक देखभाली बरोबरच त्यांना मानसीक आधारही येथे दिला जातो. एक जिव्हाळ्याचे कौटुंबिक जीवन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. गेल्या पाच वर्षात सुमारे ७० निराधार वृध्दांनी आजी आजोबांनी सेवेचा लाभ घेतला व घेत आहेत.आनंदाश्रय मध्ये दाखल झाल्यापासून अंतविधीपर्यंत असे हे सेवा कार्य आहे.आरोग्याची योग्य देखभाल आमच्या नर्स कडून केली जाते. सोबत केअर टेकर्स आहेत. योग्य आहार चहा, नाष्टा व जेवण आठवड्याने नॉन व्हेज, सहज सोपे व्यायाम, मेडीटेशन, कौंटुंबीक जिव्हाळा असलेला असा हा आनंदाश्रय परिवार आहे. सर्व कार्यकर्ते मना पासून हे सेवा कार्य दिवस रात्र आपूलकीने करीत असतात.समाजाचा आम्हास आधार हाच आमच्या या सेवा कार्याचा मुळ आधार आहे.