मा. श्री. कृष्णकांत धुळप आणि श्री. उदयकुमार पालव यांज कडून दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी जीवन संजीवन ट्रस्ट आनंदाश्रय येथे अन्नदान करण्यात आले.
गेल्या दहा वर्षात आनंदाश्रय परिवाराला आपण सर्वच बाजूने बय्रापैकी साभाळत आहात पण सध्या कोरोना महामारीने हवालदील आहोत आणि याहीवेळी या ना त्या प्रकारे आपली मदत सुरूच आहे खूप खूप आभार. अगदीच दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष सेवा देणारा सेवक वर्ग ही बाधित झालाय. त्यामुळे रोजचे जेवणही बाहेरून मागवावे लागलेय. दिवसा किमान आठ हजार खर्च वाढला म्हणजे भुर्दडच झालाय आपण सर्व असताना यातूनही निभावून निघू. असंच यथाशक्ति सहकार्य असू द्या ही विनंती.
भास्कर जोशी वायंगवडे यांनी आनंदाश्रय च्या आजी आजोबांना मनोरंजन साठी किर्तना कार्यक्रम सादर केला. तरी अशा प्रकारचे कार्यक्रम सादर करावयाचे असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा : 9970430992 / 9049916882
तौक्ते वादळाने तर सगळीकडेच तूफान तांडव केले. मोठ मोठी झाडे मोडून पडली, उन्मळून पडली. संपुर्ण सिंधुदुर्गात चक्रीवादळ व मूसळधार पावसाची दहशत पसरली. तरिहि मात्र स्थिती जणू ! पण कोण कुणाला वाचवणार? झाडांची पडझड, घरांची मोडतोड! छपरांचे पतंग ! सगळीकडे हाहाकार ! संध्याकाळी उशीरा एकदाचा जोर ओसरला... आणि झालेल्या नुकसानाचे फोटो येऊ लागले ! सगळंच भीषण होते! पण सर्वात जास्त वीजव्यवस्थेचे नुकसान झाले होते अनेक पोल मोडून उन्मळून पडले होते तारा तुटल्या होत्या, वीज खंडित झाली होती. त्यात कोरोना व लॉकडाऊनंमुळे मजुरांची वानवा! दुरुस्तीत अडचणींचा डोंगर ! एक दिवस दोन दिवस! वीज मंडळ शर्तीचे प्रयत्न करीत होते! सगळ्याच गावात घराघरात ही समस्या होती! आनंदाश्रयची तर अगदीच केविलवाणी स्थिती होती ! सहा दिवस वीज नाही! पन्नास निराधार जेष्ठांचं हे कुटुंब! वीज नाही तर पंप चालणार नाही आणि एवढ्या मोठ्या कुटुंबात मानवी हातानी पाणी तरी किती भरावं? पण ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी त्यांनी अगदी हसत खेळत कळशीभर, हंडाभर, अन् लोटाभर पाणी विहीरी वरुन स्वंयपाक घरात पाणी भरलं! संकट नैसर्गिक होतं! तक्रार कुणाकडे करायची? हसत हसत झेललं! आभिमान वाटला!
दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता मा. श्रीमती के. मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ह्या आनंदाश्रय ला भेट द्यावयास आन्न झाला.
गेली पाच वर्ष आनंदाश्रय परीवार पत्रावजा शेडमध्ये हलाखीचे दिवस जगत होता. अन्न वस्त्र निवारा व वैद्यकीय उपचार लाभार्थ्यांना विनामुल्य पुरवताना पाच वर्षात वास्तू पक्की करणं शक्य झालं नाही पण यावेळी काही दानशूर हितचिंतकांनी पुढाकार घेऊन अद्ययावत इमारत उभी केलीय.यांचं ऋण मानावं तेवढं थोडच आहे. एकुणच गेल्या दहा वर्षात हजारो समाजबांधवानी आम्हाला या निराधार जेष्ठांच्या सेवाकार्यात मदत केलेली आहे.या सर्वानाच धन्यवाद!
श्री. अभिषेक फाले यांच्या वाढदिवसा निमित्त मेडीकल तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. बालम यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
रोटरी क्लब सिंधुदुर्ग च्या वतीने आनंदाश्रय मध्ये लाभार्थांचा मेडिकल चेकअप करण्यात आला. डॉ. कोलते, प्रमोद भोगटे, गजानन कांदळगांवकर, राजन बोभाटे उपस्थित होते. तसेच मेडीसिन व व्हीलचेअर भेट म्हणून देण्यात आली.
संस्थेचे विश्वस्त मा. श्री. भाई उर्फ रघुवीर सिताराम मंत्री यांच्या पत्नी कै. सौ. भारती रघुवीर मंत्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 36 बेडची प्रशस्त इमारत आणि विश्वस्त सौ. वैशाली वसंत गावडे यांनी त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती सरस्वती न्हानू वारंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आठ बेडच्या विशेष कक्षाची इमारत संस्थेच बांधून दिली. या वास्तूचे उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न झाला.. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून या शुभ कार्यास शुभाशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.
आनंदाश्रयातील आजोबांचा वाढदिवस साजरा करताना राणे कुटुंबीय व त्यांच्या लहान मुलांनी या आजी-आजोबांसोबत गाणी सादर केली. सगळीकडे स्वतंत्र दिन साजरा होत असताना या लहान मुलांनी आईबाबां सोबत आनंदाश्रयाच्या आजोबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. आनंदाश्रयच्या या पक्षाघाताने आजारी आजोबांसाठी हा नातवंडांसोबतचा वाढदिवस सोहळा स्वर्गीय आनंद सोहळा होता. आणि तो त्यांनी आनंदाश्रुसहित अडखळत्या आवाजात व्यक्त केला.
शरीराने थकलेल्या आजी आजोबाना आश्रमातच मनोरंजन व्हावं म्हणून हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला. आनंदी जीवनासाठी तनमनाला लागणा-या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
आजोबांना रक्षाबंधन करताना मालवणी ग्रुपची मुलगी. समाजात राखी पौर्णिमेचा सण साजरा होत असताना आनंदाश्रयातील उपेक्षित आजी आजोबांची आठवण ठेऊन या मुली रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी आनंदाश्रयात आल्या.व आजी आजोबांना राख्खा बांधून व तोंड गोड करून आम्ही आपल्या सोबत आहोत याची ग्वाही दिली. आनंदाश्रयात असेच सर्व सण समाजातील कोणीनाकोणी येऊन साजरे करतात.
१ जुलै २०१६ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्हाधिकारी उदय चौधरी आनंदाश्रयच्या आवारात नारळ रोप लावताना सोबत सावंतवाडी मेडिकल असोसिएशन व डॉक्टर्स फैतार्निती. या निमित्ताने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आनंदाश्रयाच्या सेवाकार्याची माहिती जाणून घेतली व आजी आजोबांशी सावंद साधला. उत्तरउत्तरार्धातल्या या आजी आजोबासाठी चाललेल्या सेवा कार्याचे कौतुक करीत आनंदाश्रय सेवाश्रमाला पुन्हा एखदा सवडीने भेट देऊन मदत करीन असे आश्वासन दिले.या वेळी केइएम हॉस्पिटल मुंबईच्या निवृत्त मेट्रन श्रीम वैशाली गावडे उपस्थित राहिल्या व आनंदाश्रयच्या परिचारिकांना मार्गदर्शन केले.
आनंदाश्रयातील निराधार आजी- आजोबांना मोफ़त सेवा - केवळ सामुदायिक रजा घेत फ़क्त भाषणबाजीचे कार्यक्रम न करता सुकळवाड पंचक्रोशीतील नाभिक बांधवांनी संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आनंदाश्रयतील निरधार आजी-आजोबांना मोफ़त सेवा देत आगळ्या वेगळ्या पध्दतीने पुण्यतिथी साजरी करित एक आदर्श घालून दिला राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या माध्यामातून सुकळवाड- कट्टा विभागातील नाभिक बांधवांनी या वर्षी निराधार बांधवांना निशुल्क सेवा देत संतशिरोमनी सेना महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्याचा निर्णय घेतला.
घरच्या वातावरणात आजी – आजोबांनी अनुभवले सुखाचे क्षण एक दिवस कुटुंबासमवेत, निराधार आजी- आजोबांसाठी आनंदाश्रयचा नवा उपक्रम. वृध्दाश्रमातील निराधार आजी- आजोबांना आनंद मिळावा यासाठी आश्रमात येऊन आजी- आजोबांसमवेत वाढदिवस साजरे करणारे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणारे अनेक जण भेटतात.पण त्याही पुढचे पाऊल टाकत आनंदाश्रयातील निराधार आजी- आजोबांना घरी नेऊन त्यांच्यासाठी आनंदोत्सव साजरा करणारे आजपर्यंत कुणी पाहिलेत? निश्चितच नसणार. पण हे वास्तवात उतारवयात कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील परब कुटुंबीयांनी आनंदाश्रयातील एका निराधार आजी व आजोबांना एक दिवसासाठी घरी नेऊन त्यांना कुटुंबप्रमुखाचा दर्जा देत पुरेपूर आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या माणसांमध्ये रमावं गप्पाटप्पा… सुख- दु:ख वाटली जावी, ही तर प्रत्येक व्यक्तीची स्वाभाविक मानसिक गरज असते. ही गरज लक्षात घेऊन आनंदाश्रयाने एक दिवस कुटुंबासमवेत या नव्या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवली. या नव्या संकल्पनेची सुरुवात करण्याचे भाग्य कणकवली तालुक्यातील हुंबरट गावचे जेष्ठ नागरिक प्रभाकर परब व त्यांच्या कुटुंबीयांना लाभलं.
आजी आजोबांसाठी संगीतभजनाचा सुस्वर कार्यक्रम सादर केला. आध्यात्मिक आनंद दिला. कार्यक्रम श्री. अजित परब वेंगुर्ले यांच्या सौजन्याने विनामूल्य सादर करण्यात आला.
आनंदाश्रय अणाव व ग्रामपंचायत कसाल यांच्या वतीने कसाल आठवडा बाजारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘प्लास्टिक टाळा, कापडी पिशवी वापरा’ ‘स्वच्छ सिंधुदुर्ग, कचरामुक्त सिंधुदुर्ग अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
स्वातंत्रदिनानिमित्त आनंदाश्रयात रुग्णवाहिका लोकार्पणावेळी मान्यवर आनंदाश्रयात स्वातंत्रदिन साजरा. अणाव येथील आनंदाश्रयात स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी अनिल देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. आनंदाश्रयचे बबन परब, मोहन नाईक, प्रशांत भाट, बाबा वालावलकर, आबा शिरसाट आदी उपस्थित होते. रुग्णवाहिकेचा आश्रमासोबत समाजातील इतर गरजू लोकांना माफ़क दरात उपयोग होणार आहे. सदरची रुग्णवाहिका ओरोस येथिल मोहन नाईक यांनी कै. महेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फ़े संस्थेस दिली आहे. बबन परब यांनी जिल्हा रुग्णालयाकडून नेहमी दिल्या जाणा-या मदत व सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.
निराधार आजी- आजोबांच्या सेवेकरिता तुम्ही सर्वजण एक दिवस पुर्णवेळ येथे येऊन त्यांची सेवा व औषधोपचार करता, त्यांना आनंदीत ठेवता हेच तुमचे मोठे योगदान आहे. मोबाईलवरील मित्र परिवार साधत एकत्र येऊन ही सेवा तुम्ही करत आहात यातच तुमचे मोठे भाग्य आहे. मालवणी मित्रमंडळाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जीवन संजीवन सेवा ट्रस्ट – आनंदाश्रय मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला. होता. आजोबा- आजींच्या सेवेसाठी जिल्हयातील डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. स्नेह भोजनाचा आनंद विरंगुळा म्हणून सुगम संगीत, शालेय मुलांना शालेय वस्तू भेट दिल्या. सास्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या शालेय मुलांना बक्षिसांचे वाटपही करण्यात आले.
आजोबांना रक्षाबंधन करताना श्री. रामेश्वर विद्यालय तळगाव च्या विद्यार्थ्यींनी आज समाजात राखी पोर्णिमेचा सण साजरा होत असताना आनंदाश्रयातील उपेक्षित आजी आजोबांची आठवण ठेऊन या विद्यार्थ्यींनी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी आनंदाश्रयात आल्या. व आजी आजोबांना राख्या बांधून व तोंड गोड करुन आम्ही आपल्या सोबत आहोत याची ग्वाही दिली. आनंदाश्रयात असेच सर्व सण समाजातील कोणीनाकोणी येऊन साजरे करतात.
अणाव आनंदाश्रयमधील निराधार वृध्दांना रहिवासी दाखले मिळवून दिल्यानंतर आज भाजपचे पदाधिकारी प्रभाकर सावंत, चारुदत्त देसाई व नीलेश तेंडुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून आश्रमातील निराधारांची आधारकार्ड बनविण्याचा कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या विशेष सहकार्यातून आधारकार्ड काढणारी यंत्रणा आश्रमाच्या ठिकाणी आणून या निराधार आजी-आजोबांची आश्रमातच आधारकार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात आली. आधारकार्ड व इतर महत्वाचे दाखले नसल्यामुळे आनंदाश्रयात राहणा-या आजी-आजोबांना शासनाच्या कुठल्याही सेवा,सुविधा मिळत नव्हत्या. ही अडचण लक्षात घेऊन भाजपच्या वरील पदाधीका-यांनी या आजी-आजोबांना रहिवासी दाखले मिळवून दिले. त्याचबरोबर या वृध्द बांधवांना वयोमानानुसार आधारकार्ड काढण्यासाठी बाहेरच्या केंद्रावर जाणं अशक्य असल्यामुळे आश्रमातच आधारकार्डचा कॅम्प लाऊन या सर्व वृध्द बांधवांनी आधारकार्ड काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भाजपचे पदाधिकारी प्रभाकर सावंत यांच्या हस्ते व पत्रकार शेखर सामंत, अणावचे पोलीस पाटील सुनील पाटकर महा ई- केंद्राचे प्रमुख मेस्त्री, केशव वर्मा आनंदाश्रचे संस्थापक बबनकाका परब उपस्थित होते.
ग्लोबल फ़ाउंडेशन, सिंधुदुर्ग तर्फ़े जेष्ठ नागरीक दिनाचे निमित्ताने आनंदाश्रायाच्या आजी- आजोबांची नेत्र तापसनी करण्यात आली.
आजी आजोबांसाठी ग्लोबल फ़ाउंडेशन तर्फ़े किर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या आजी- आजोबांना आध्यात्मिक आनंद दिला.
आनंदाश्रयात आजी-आजोबांसोबत वाढदिवस केक कापून साजरा करताना शिवम चव्हाण व कुटुंबीय.
श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ़ डी फ़ार्मसीच्या विद्यार्थ्यींनीनी आपल्या वैद्यकीय अभ्यासासोबत आनंदाश्रय मधील आजी आजोबांसोबत काही क्षण घालविले तसेच येथील थोडा वेळ श्रमदान केले.
श्री. कोले साहेब यांनी आपला वाढदिवस एखाद्या हॉटेल मध्ये साजरा न करता त्यांनी आपला वाढदिवस अणाव येथील आनंदाश्रय मधील या ३० आजी आजोबांसमवेत आपल्या कर्मचारी व परीवाराच्या सोबतीने साजरा केला . यावेळी अल्पोहार देण्यात आला. तसेच धान्य स्वरुपात मदत केली.
श्री. संदीप पांडुरंग हांगे यांनी आपल्या मुलाचा कु. ( समर्थ ) ७ वा वाढदिवस आनंदाश्रय मध्ये साजरा केला. आनंदाश्रय मधील या ३० आजी आजोबांसमवेत आपल्या परीवाराच्या सोबतीने साजरा केला . यावेळी आजी आजोबा समवेत स्नेहभोजन करण्यात आले .